सातारा जिल्ह्यात 174 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 5 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 174 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 339 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 9, कोरेगांव येथील 39, वाई येथील 21, खंडाळा येथील 34, रायगांव येथील 66, पानमळेवाडी येथील 11, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 6, दहिवडी येथील 39, खावली येथील 7, पिंपोडा येथील 6 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 46 असे एकूण 339 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 200441
एकूण बाधित -- 47404
घरी सोडण्यात आलेले -43278
मृत्यू -- 1585
उपचारार्थ रुग्ण -- 2541

No comments