कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदगुरू व महाराजा उदयोग समुहाच्या सेवकांना विमा संरक्षण - दिलीपसिंह भोसले

फलटण - सध्या जगभरात पसरत असलेला कोव्हिड १९ अर्थात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर सदगुरू व महाराजा उदयोग समुहाचे शिल्पकार श्री .दिलीपसिंह भोसले यांनी सेवकांच्यासाठी स्टार हेल्थ पॉलीसीचे कोरोना कवच देऊन प्रत्येक सेवकांना रूपये ५ लाखापर्यंतची पॉलीसी उतरविणेत आली.
कोरोना संकटात सेवकांना आर्थिक भार जास्त होवु नये व संरक्षण म्हणुन सदरची स्टार हेल्थ पॉलीसी उतरविणेत आली आहे . या पॉलीसीचा सदगुरू पतसंस्थेतील ३९ सेवकांनी महाराजा मल्टीस्टेटमधील २१ सेवकांनी व सहकार महर्षि हणमंतराव दिनकरराव पवार या संस्थेच्या २१ सेवकांनी असे एकुण ८१ सेवकांनी सदर पॉलीसीचा लाभ घेतला . अशी माहीती सदगुरू व महाराजा उदयोग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप जगताप यांनी दिली.
या पॉलीसीचा सेवकांना अनपेक्षितपणे उदभवणारे परिस्थीतीत फायदा होईल म्हणुन ही पॉलीसी उतरविणेत आली आहे असे सदगुरू ब महाराजा उदयोग समुहाचे शिल्पकार श्री. दिलीपसिंह भोसले यांनी सांगितली.
No comments