फलटण तालुक्यात 8 पॉझिटिव्ह रुग्ण ; मलठण 4, गोखळी 3, राजाळे 1

फलटण 6 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये राजाळे येथील 1, गोखळी येथील 3, व फलटण शहरातील 4 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये राजाळे येथील 21 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गोखळी तालुका फलटण येथील 9 वर्षीय मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 45 वर्षीय पुरुषाची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर फलटण शहरामध्ये मलठण येथील 22, 25 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जिंतीनाका येथील 42 वर्षीय पुरुषाची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
No comments