NRC व CAA विरोधी आंदोलनांमध्ये करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यात याव्यात
![]() |
तहसीलदार फलटण यांच्याकडे निवेदन देताना मुस्लिम समाज बांधव |
फलटण दि. 31 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - डॉ.कफील खान साहेब व NRC व CAA विरोधी आंदोलनामध्ये ज्यांच्यावर केसेस केल्या गेल्या त्या सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत फलटण येथे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील 550 जिल्ह्यातील व 4500 तालुक्यात केले जात आहे. काल फलटण शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेऊन तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन, NRC व CAA विरोधी आंदोलनांमध्ये करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यात याव्यात. आंदोलनांमधील सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली.
यावेळी सलीमभाई शेख (वस्ताद), हाजी निजाम भाई, अमीर शेख, पप्पू शेख, मेहबूबभाई मेटकरी,रियाजभाई इनामदार, हाजी सादिकभाई बागवान, जमशेद पठाण, रहीम तांबोळी, रियाज बागवान, सैफुला शेख, सिकंदर डांगे , मुनिर तांबोळी, अजीज शेख, जावेद शेख,अबिद खान, शहाबूदिन शेख व इतर मान्यवर उपस्थित होते
No comments