फलटण तालुक्यात 15 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण दि. 18 जुलै (Gandhawarta News Service) - फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज 18 जुलै रोजी रात्री उशिरा आलेल्या कोविड 19 च्या चाचणी अहवालानुसार फलटण तालुक्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. साखरवाडी येथे 8 रुग्ण बाधित सापडले आहेत. चव्हाणवाडी येथे 4 रुग्ण बाधित सापडले आहेत. सावंतवाडा (उपळवे) येथे 2 रुग्ण बाधित सापडले आहेत तर फलटण शहरांमध्ये एक रुग्ण असे एकूण 15 रुग्ण बाधित सापडले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
मौजे साखरवाडी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ४३ व ५० वर्षांचे पुरुष, १५ व १६ वर्षांची मुले, ३८, ४३ व ६५ वर्षांच्या महिला आणि १८ वर्षांची मुलगी असे एकूण ८ व्यक्ती यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहे.
मौजे सावंतवाडा (उपळवे) येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मौजे चव्हाणावाडी येथील २५ व ५३ वर्षीय पुरुष तसेच २२ व ४३ वर्षीय महिला असे एकूण ४ व्यक्तींची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मौजे सावंतवाडी(उपळवे) येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील सावंतवाडीचे २६ वर्षीय पुरुष (मुलगा) तसेच ४६ वर्षीय महिला (पत्नी) असे एकूण २ व्यक्तींची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
फलटण शहरातील महात गल्ली येथील ४५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments