गोखळी पाटी येथून ट्रॅक्टर चोरीस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे गोखळी ता. फलटण गावचे हद्दीतून स्वराज कंपनीचा ८५५ या मॉडेलचा ट्रॅक्टर चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ५/१/२०२४ रोजी रात्रौ १०.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे गोखळी ता. फलटण गावचे हद्दीतील गोखळी पाटी चौक येथुन, दत्तात्रय स्वामीनाथ माने यांच्या मालकीचा दहा लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा स्वराज कंपनीचा ८५५ या मॉडेलचा ट्रॅक्टर त्याचा क्रमांक एम.एच. ११ सी.डब्ल्यु. ०५३६ हा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन घेवुन गेला असल्याची फिर्याद दत्तात्रय स्वामीनाथ माने रा.आसू ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अभंग करीत आहेत.
No comments