प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्या स्थित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व दीपोत्सवाचे आयोजन - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - फलटण तालुका भाजपा व शहर भाजपा व फलटण तालुका आध्यात्मिक आघाडी भाजपा यांच्या वतीने, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण, फलटण येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्या स्थित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व दीपोत्सव तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
दि.२२ जानेवारी २०२४ रोजी, लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण, फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, विरोधी पक्ष नेते, सौ जिजामाला नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या, सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर, चेअरमन स्वराज पतसंस्था यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता प्रभू रामचंद्र प्रतिमा पूजन करण्यात येईल. सकाळी १० वाजता सांप्रदायिक भजन कार्यक्रम. दुपारी ११ ते १.३० वाजता प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना थेट प्रक्षेपण. दुपारी २ ते ४ एकतारी भजन व महिला भजनी मंडळ कार्यक्रम. सायंकाळी ४ ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम व झांज पथक कार्यक्रम. सायंकाळी ६ नंतर दीपोत्सव, दिवाळी, फटाक्यांची आतषबाजी व महाआरती होणार आहे तरी सर्व पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
No comments