Breaking News

ऊस वाहतूकदारांना मारहाण करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक

Attempted forced theft by beating sugarcane transporters; Both were arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - मौजे मांडव खडक गावचे हद्दीत ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर  उपळवे येथून  कारखान्याला ऊस घालून परत येत असताना रस्त्यात जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करून, मारहाण केली तसेच दुसऱ्या एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास लाकडी दांडके मारल्याने त्याचा ट्रॅक्टर जुगाड पलटी झाल्याप्रकरणी मांडव खडक येथील शुभम संजय जाधव व दोन-तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना रात्री दीड वाजता माहिती मिळाली की यातील संशयित आरोपी शुभम संजय जाधव व स्वप्नील संजय जाधव राहणार मांडव खडक हे मांडव खडक गावात दंगा करत आहेत अशी माहिती मिळाली.  पोलीस निरीक्षक महाडिक यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक हुलगे, पोलीस हवलदार साबळे, पोलीस शिपाई खरात, पोलीस हवालदार चतुरे यांना त्या ठिकाणी पाठवले व सदर आरोपी यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस  पोलीस कोठडी सुनावली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ९/१/२०२४ रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास स्वराज साखर कारखाना, उपळवे येथून उसाचा ट्रॅक्टर खाली करून, गुणवरे येथे जात असताना, मौजे मांडवखडक ता. फलटण  गावचे हद्दीतून स्पीड ब्रेकर जवळ ट्रॅक्टरचा वेग कमी झाला असता, शुभम संजय जाधव राहणार मांडवखडक व इतर दोन-तीन लोक हे ट्रॅक्टर जवळ येऊन जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने,  रफिक अब्बास शेख यास हाताने मारहाण करून, शिवीगाळ वदमदाटी केली व जीवे मारणेची धमकी दिली व रफिक अब्बास शेख याच्याकडील मोबाईल व पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मारहाण करताना शुभम संजय जाधव यांचे हातातील कडे रफिक अब्बास शेख याच्या नाकावर लागल्याने त्यास किरकोळ जखम झाली आहे व दुसऱ्या ट्रॅक्टर वरील चालक महावीर दत्तात्रय क्षीरसागर राहणार उडवंडी तालुका दौंड जिल्हा पुणे याला, दांडके मारल्याने त्याचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने, ट्रॅक्टरला जोडलेले उसाने भरलेले जुगाड पलटी झाले असल्याची फिर्याद रफिक अब्बास शेख रा.गुणवरे ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चतुरे हे करीत आहेत.

No comments