Breaking News

कत्तलीसाठी चालवलेली गोवंशी जनावरे पकडली : ५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Jersey cows driven for slaughter were caught by the police

    फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) दि.२६ - बरड ता. फलटण गावचे हद्दीत अशोक लेलंड या चारचाकीतून, ३ जर्सी गाईंचे पाय बांधून, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडले असून, एकूण ५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    याप्रकरणी दोघांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, समाधान नाना थोरात  रा. अकोले बु ता. माढा जि सोलापूर, सागर कबीर खंडागळे रा.टेंभुर्णी ता. माढा अशी संशयीतांची नावे आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक. २६/११/२२०३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या  सुमारास मौजे बरड ता. फलटण गावच्या हद्दीत घोलप वस्ती येथे, पुणे ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवर,  समाधान नाना थोरात व सागर कबीर खंडागळे हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच ४५ ए एफ ९०६९ या वाहनांमध्ये जर्सी जातीच्या तीन गाई क्रूरतेने वागणूक देऊन, त्यांचे चारही पाय बांधून, त्यांच्या चारापाण्याची सोय न करता, त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून न घेता, कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आल्या प्रकरणी वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चांगण हे करीत आहेत.

No comments