Breaking News

बलात्कार ; दुसऱ्या व्यक्तीच्या व्हाट्सअपवर कॉल करून, रेकॉर्डींग करण्यासाठी महिलेवर दबाव ; आरोपीस अटक

Rape; Pressuring woman to make recording by calling other person's WhatsApp; Accused arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ -  पीडित महिलेला विविध आमिषे देऊन, तिचा विश्वास संपादन करून, तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तिला व्हाट्सऍपला अश्लील क्लिप पाठवली व क्लिप प्रमाणे दुसऱ्या व्यक्तीस व्हाट्सअपवर फोन करून, रेकॉर्डींग करण्यासाठी पीडित महिलेला अनेकवेळा सांगितले. परंतु पीडित महिलेने त्यास नकार दिल्याने, भांडणे करून मारहाण करून, जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व तिचे सोन्याचे दागिने काढून घेतले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. 

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला याप्रकरणी शिवाजी सुभाष गोळे रा.चिखलठाण नं 1, करमाळा, सोलापुर सध्या राहणार शिजवल सिटी, नाईकबोंबवाडी,फलटण जि.सातारा याच्या विरोधात बलात्कार, मारहाण व चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट यांनी गुन्ह्यातील आरोपीवर पाळत ठेवून, त्याला त्याच्या गावी अटक केली आहे. त्यास फलटण येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास ४ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, शिवाजी सुभाष गोळे, रा. चिखलठाण नं 1, ता. करमाळा, जि. सोलापुर याने माझा नवरा दारूचा व्यसनी आहे, हे माहीती असल्याने, त्यांनी मला माझे नवऱ्या पासून घटस्फोट घे, माझे सोबत लग्न करतो व त्याची जमीन माझे नावावर करण्याचे अमिष दाखवून, माझा विश्वास मिळवला, माझे सोबत शिवाजी गोळे याने अनेकवेळा शरीर सबंध केले. माझे मोबाईलच्या व्हॉटसअँपवर अश्लील व्हिडीओ पाठवला व त्या व्हिडाओ मधील महीला प्रमाणे मी शिवाजी गोळे याच्या ओळखीचे डिडोळे साहेबांच्या व्हॉटसअँपवर फोन करून रेकॉर्डींग करण्यासाठी शिवाजी गोळे याने मला अनेकवेळा सांगितले. तसे मी न केल्यामुळे शिवाजी माझे सोबत भांडण करू लागला. पुढे तो मला त्याच्या सोबत लग्न कर, माझे गाडया जेऊर येथे घेवून चल, माझी मुलगी प्रज्ञा त्याला दत्तक दे, त्याच्या सोबत लग्न कर अशा विविध कारणावरून मला त्रास देवून मला व मुलीला मारण्याची धमकी देवू लागला. दिनांक  १०/६/२०२३ रोजी टेंभुर्णी येथील रूममध्ये मी गेली असता, तेथे शिवाजी गोळे याने त्याच्या सांगण्या प्रमाणे कर, यावरून माझे सोबत भांडण करून, मला हाताने हाणमार केली व माझे सोबत जबरदस्तीने शरीर सबंध केले. त्यानंतर माझे गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुबफुल व हातातील दोन अंगठया एवढे सोन्याचे दागीने काढून घेतले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

    गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रानगट हे करीत आहेत, या प्रकरणी त्यांनी गुन्ह्यातील आरोपीवर पाळत ठेवून, त्याला त्याच्या गावी अटक केली व न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस हवलदर माने, पोलीस शिपाई इंगळे  यांनी केलेली आहे.

No comments