Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जमावबंदी आदेश ; अभिवादानाची मुभा

Prohibition order in Chhatrapati Shivaji Maharaj Chowk area

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० - दिनांक २१/०४/२०२३ रोजीचे सायं ६.०० ते दि. २२/०४/२०२३ रोजीचे रात्री १२.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून कलम १४४ अनुसार जमाबंदी आदेश पारित करण्यात आले आहेत. शासकीय कार्यक्रमा व्यतिरिक्त खाजगी वैयक्तीक व खाजगी सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात येत आहे. मात्र सदर - परिसरामध्ये नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या / पुतळ्याच्या दर्शनाची / अभिवादनाची मुभा असेल असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.

    फौजदारी  प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हा रूग्णालय फलटण, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फलटण एस.टी. स्टँड या परिसरामध्ये दिनांक २१/०४/२०२३ रोजीचे सायं ६.०० ते दि. २२/०४/२०२३ रोजीचे रात्री १२.०० पर्यंत शासकीय कार्यक्रमा व्यतिरिक्त खाजगी वैयक्तीक व खाजगी सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात येत आहे. मात्र सदर - परिसरामध्ये नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या / पुतळ्याच्या दर्शनाची / अभिवादनाची मुभा असेल असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.

No comments