Breaking News

जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Zilla Parishad to provide computers to schools - Minister of State Abdul Sattar

    मुंबई  : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगकरिता संगणक देण्याबाबतचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यास संगणक उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

    पालघरच्या जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग सुविधा मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उशिरा प्राप्त झाला असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज जोडणी बंद केली असल्यास ग्रामविकास विभागाकडून वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी सांगितले.

    याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी विचारला होता.

No comments