15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे 3 जानेवारी 2022 पासून लसीकरण ; कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर सुरु करण्यात येणार
गंधवार्ता वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना, 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्याची घोषणा केली आहे. 3 जानेवारी २०२२ पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्याचा शुभारंभकरण्यात येणार असल्याची करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. लवकरच देशात अनुनासिक आणि डीएनए लसही सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी, DCGI ने लहान मुलांच्या लसीसाठी कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरु करण्यात येणार असल्याचीही घोषणा मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरू नका, सतर्क राहा असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की नवीन संसर्गास घाबरू नका, परंतु प्रतिबंध आणि कोविड नियमांचे पालन करा. याशिवाय पंतप्रधानांनी आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि लसीकरणाबाबत माहिती दिली.
15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा।
— PMO India (@PMOIndia) December 25, 2021
2022 में, 3 जनवरी को, सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी: PM @narendramodi
No comments