फलटण मध्ये आणखी २ ओमीक्रोन पॉझिटिव्ह ; एकूण ५ बाधित
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. २५ डिसेंबर - फलटण शहरात युगांडा येथून आलेल्या व्यक्तींच्या ओमिक्रॅान जिनोम सिक्वेन्सींग टेस्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर, त्यांच्या आई व वडील यांच्या ओमीक्रोन टेस्ट या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यातील ओमीक्रोन बधितांची संख्या ५ झाली आहे.
युगांडाहून फलटण शहरात आलेल्या पती, पत्नी व त्यांची मुलीची ओमीक्रोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या काहीजणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांचे नमुने ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. काल त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
No comments