Breaking News

वडले ता.फलटण येथून ४ शेळ्या व ३ पिल्ले यांची चोरी

Theft of 4 goats and 3 chicks from Wadle, Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  मौजे वडले ता. फलटण गावच्या हद्दीत घराचे पाठीमागे असली तारेच्या वाडग्यातुन १८ हजार रुपये किंमतीच्या ४ शेळ्या व ३ शेळ्यांची पिल्ले चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२३ डिसेंबर २०२१  रोजीचे रात्रौ११:३० वाजता ते दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी १:३० वाजण्याच्या दरम्यान, मौजे वडले ता. फलटण गावच्या हद्दीत कलावती पिराजी काळे यांच्या घराचे पाठीमागे असलेल्या तारेच्या वाडग्यातुन, तीन ते चार वर्षे वयाच्या ४ शेळ्या व तीन ते चार महिने वयाची ३ शेळ्यांची पिल्ले असा एकूण १८ हजार रुपये किंमतीच्या शेळ्या अज्ञात चोरट्यांनी लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद कलावती पिराजी काळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लिमन हे करीत आहेत.

No comments