फलटण मध्ये ओमीक्रोन ; परदेशातून आलेल्या नागरिकांची ओमिक्रॅान टेस्ट पॉझिटिव्ह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. १८ डिसेंबर - फलटण शहरात युगांडा येथून आलेल्या व्यक्तींच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या नंतर त्यांच्या ओमिक्रॅान जिनोम सिक्वेन्सींग टेस्ट देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत, त्यामुळे फलटण शहरासह सातारा जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
युगांडाहून फलटण शहरात आलेल्या पती, पत्नी व त्यांची दोन मुले यांची खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. फलटण शहरात परदेशातुन आलेले कोरोना बाधित कुटूंब आढळून आल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या होत्या. सदर कुटूंबाची युगांडा येथील विमानतळावर केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतू भारतात आल्यानंतर या कुटूंबीयांची कोरोना चाचणी येथील विमानतळावर घेण्यात आली की नाही याबाबतची स्पष्ट माहिती समजू शकली नव्हती. दि. ९ डिसेंबर रोजी रात्री सदर कुटूंब फलटण येथे आले होते. याबाबत माहिती प्रशासनास मिळताच त्यांची चाचणी घेण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. यानंतर संबंधित कुटूंबियांचे पुन्हा चाचणी घेण्यात येवून ते सातारा येथे पाठविण्यात आले होते, तेथेही ते पॉझिटिव्ह आल्याने ते ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या तपासणीसाठी ते पुणे येथे पाठविण्यात आले होते. सदर कुटूंबीय शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात देखरीखीखाली ठेवण्यात आले होते. परंतू आता त्यातील तीघांचे ओमिक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटणकरांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आले.
सदर कुटूंबातील पती, पत्नी, मुलगी व मुलगा यांपैकी मुलगासोडून अन्य तिघे ओमिक्रॉन बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे ते सध्या जीथे दाखल आहेत. त्या उपजिल्हा रुग्णालयातील संबधित डॉक्टर व स्टाफ यांची टेस्ट करण्यात येणार आहे.
No comments