निंभोरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
निंभोरे (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण-कोरेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते निंभोरे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पार पडला.
आ. दिपकराव चव्हाण साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून निंभोरे येथील भैरवनाथ मंदीर ते मोरे वस्ती खडीकरण व डांबरीकरण रस्ता तसेच भैरवनाथ मंदीर सभा मंडप आणि १५ व्या वित्त आयोगातून निंभोरे येथील हनुमंत महाराज घर ते नंदकुमार रणवरे घर गटार व डांबरीकरण रस्ता या कामांचा शुभारंभ मा.आ.श्री.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला .
यावेळी फलटण पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ.रेश्माताई भोसले , सरपंच सौ.कांचनताई निंबाळकर , उपसरपंच श्री.मुकुंदराव रणवरे (काका) , तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.राजाभाऊ मदने सर्व ग्रामपंचायत सदस्य व निंभोरे गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments