जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ डिसेंबर - फलटण येथे उद्या रविवार दिनांक 19 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या जिल्हा क्रॉस कंट्री निवड स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथे दि. १९ रोजी आयोजित केलेल्या, जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेचे कॅम्पेनिंग करताना, विधान परिषदेचे सभापती श्रीमती रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण तालुका असोसिएशनचे नामदेव मोरे सर, तायाप्पा शेंडगे सर, अॅड.रोहित अहिवळे, सुहास कदम, शरद जाधव, जनार्दन पवार उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मध्ये होत असलेल्या, जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेची संपूर्ण माहिती जाणून घेऊन, सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि फलटण जिमखाना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धा २०२१- २२ चे आयोजन दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ : ३० वाजता, सजाई गार्डन, गिरवी नाका नजीक, फलटण जि. सातारा येथे करण्यात आले आहे.
No comments