Breaking News

फलटण येथे स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२२ स्पर्धेचे आयोजन

Clean Innovative Technology Challenge 2022 organized at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - स्वच्छ सर्वेक्षण २०२२  व  माझी  वसुंधरा अभियान अंतर्गत नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता फलटण नगरपरिषद, कमिन्स इंडिया फाऊंडेशन आणि आरोहणम संस्था संयुक्तपणे स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२२   स्पर्धा  आयोजीत  करीत आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असेल ज्यामध्ये स्वच्छ तंत्रज्ञान आव्हान, विशेषत: चार थीमॅटिक श्रेणींमध्ये उपाय शोधतील, उदा. (i) सामाजिक समावेशन, (ii) शून्य डंप (घन कचरा व्यवस्थापन), (iii) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि (iv) डिजिटल सक्षमीकरणाद्वारे पारदर्शकता.

    गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) अंतर्गत स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० (SBM-U 2.0) ने स्वच्छ तंत्रज्ञान आव्हान सुरू केले. भारतातील कचरा व्यवस्थापन क्षेत्राच्या उद्योजकीय क्षमतेचा उपयोग करून घेण्याचा आणि स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० अंतर्गत एंटरप्राइझ विकासासाठी सक्षम वातावरणाला प्रोत्साहन देण्याचा या चॅलेंजचा प्रयत्न आहे.

    सर्व स्पर्धांचा कालावधी हा ६ डिसेंबर २०२१ ते ६ जानेवारी २०२२ असा असेल.  स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकास प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धक अधिक माहितीसाठी आरोहणम प्रतिनिधी श्री मनीष काकडे (मो.8793302203)/सचिन काळुखे (मो.7743977977) यांना संपर्क साधू शकतात.

    सदर स्पर्धांकरीता प्रवेश विनामुल्य राहील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या प्रवेशिका, नोंदणी गुगल फॉर्म साठी लिंक https://forms.gle/EG8cmkgUA5H7mZnX6 वर पाठवता येईल. नगरपरिषद  कोड ८०२८६६ नमूद करावे.

    सर्व स्पर्धेचे विषय - (i) सामाजिक समावेशन, (ii) शून्य डंप (घन कचरा व्यवस्थापन), (iii) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि (iv) डिजिटल सक्षमीकरणाद्वारे पारदर्शकता. इत्यादी राहतील.

    सदर स्पर्धा सर्व वयोगटांकरिता खुली असून  स्पर्धेमध्ये नागरिक,  विद्यार्थी, शैक्षणिक संस्था , स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा समूह, स्टार्ट अप, कंपनी सहभागी होऊ शकतात. शहरातील सर्व नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होवून स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजि चॅलेंज २०२२ मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन  फलटण परिषदचे मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड यांचेमार्फत करण्यात  येत आहे.

No comments