Breaking News

सामाजिक उपक्रमाद्वारे श्रीमंत विश्‍वजीतराजेंचा वाढदिवस साजरा

Celebrate the birthday of  Vishwajeetraje through social activities

    फलटण, (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.23 -: कुरवली (ता.फलटण) येथील ओंकार वृद्धाश्रमात फळे व खाद्यपदार्थांचे वाटप करुन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राजे गटाचे कट्टर समर्थक प्रीतसिंह खानविलकर, निलेश बुरुंगले, अध्यक्ष रुपेश नेरकर, प्रविण बोराटे यांनी केले होते. 

    कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमंत विश्‍वजीतराजे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी इतर अनावश्यक खर्च टाळून ओकार वृद्धाश्रम येथे जावून तेथील निराधार वृद्धांना बिस्कीट, केळी, डाळींब व गुलाबजामचे वाटप करुन केक कापून श्रीमंत विश्‍वजीतराजेंना शुभेच्छा दिल्या. 

    यावेळी वृद्धाश्रमातील उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक करुन श्रीमंत विश्‍वजीतराजे यांना उदंड आयुष्यासाठी आशिर्वाद दिले.

No comments