Breaking News

श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते खटकेवस्ती येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन

Bhumi Pujan of Pradhan Mantri Awas Yojana at Khatkevasti under the auspices of Ramraje Nike Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ डिसेंबर - खटकेवस्ती ता. फलटण  येथील १०० गरीब कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्यात येणार असून यासाठी लागणारी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, सदर जागेचा सातबारा उतारा लाभार्थांच्या नावावर होणार असल्यामुळे हा गृहप्रकल्प एक राज्यातील आदर्श व दिशादर्शक आहे. या योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक १८ रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती  ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होत असून, अध्यक्षस्थानी आ. दिपकराव चव्हाण असणार असल्याची माहिती खटकेवस्तीचे ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे यांनी दिली आहे.

    महाआवास अभियान टप्पा -२ सन २०२१- २१२२ चा टप्पा असून फलटण पंचायत समिती आणि खटकेवस्ती ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भुमीपुजन सोहळा व ७/१२ उतारा वाटप केला जाणार आहे.  या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, डी.एस. बोबडे सावंत, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, डॉ. बाळासाहेब शेंडे, संजय सोडमिसे, सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे, उपसरपंच मंदाकिनी तानाजी सस्ते, ग्रामसेवक संजय देवकर, सविता बजरंग खटके, योगेश तानाजी गावडे, धनंजय पवार, उषाताई गावडे, वैशाली नवनाथ गावडे, लक्ष्मण तात्या दडस, रंजना सचिन खटके, नलिनी रामचंद्र खटके, नवनाथ नारायण खटके यांची उपस्थिती राहणार आहे. 

    या कार्यक्रमास फलटण तालुक्यातील पुर्व भागातील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments