Breaking News

मंत्रिमंडळ निर्णय - समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू

 मंत्रिमंडळ निर्णय
Cabinet Decision - 7th pay commission applied to teachers of social work colleges

    मंत्रिमंडळ निर्णय - (दि. ६ ऑक्टोबर २०२१) - मुंबई, सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य  विभागाच्या  समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने  7 व्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतनसंरचना लागू  करण्यास  मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

    यासाठी 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च 2019 पर्यंत 52 कोटी 74 लाख 57 हजार 600 एवढा खर्च थकबाकीसाठी  येणार आहे. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा असा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. याशिवाय इतर खर्च मिळून 80 कोटी 64 लाख 16 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

No comments