Breaking News

दिलासा ! फलटण तालुक्यात 21 कोरोना बाधित

21 corona affected in Phaltan taluka;  highest in City

    फलटण दि. 27 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 16 रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णामध्ये आज सलग दुसर्‍या दिवशीही घट आढळल्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

      काल  दि. 26 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 21 बाधित आहेत. 21 बाधित चाचण्यांमध्ये 6 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 15 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 16 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  धुळदेव 1, खुंटे 1,  खटकेवस्ती 1, ढवळ 2, बरड 1, विडणी 2, निरगुडी 1, शेरेचीवाडी 1, सोमंथळी 1, चौधरवाडी 1, साखरवाडी 1, जाधववाडी 1, राजुरी 2  रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments