लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे
![]() |
निवेदन देताना किशोर घोलप, बाळासो खुडे, सतीश इगंळे, विशाल इगंळे |
फलटण दि. 31 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका सौ मनीषा घोलप व फलटण शहरातील विविध संघटनांनी केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून महाराष्ट्रातील आमदार व खासदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्ज पाठवुन मागणी केली असुन, हे वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुके त्यांना यावर्षीच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केंद्र सरकार कडे करीत आहोत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शोषित उपेक्षित व कामगारांसाठी लढा उभारून संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्राणपणाने लढत, मुंबई ही महाराष्ट्राला मिळवुन दिली आहे, अशा या महापुरूषाला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीला पाठिंबा म्हणून सौ,मनिषा किशोर घोलप (नगरसेविका,फ,न,प,फ) सौ,भागिरथी देवदास खुडे (मा,सरपंच व सदस्य ठाकुरकी), किशोर आनंदा घोलप, सतीश संजय इगंळे, गौतम आप्पा घोलप, विशाल सुरेश इगंले, विकी संजय खुडे, भारत प्रल्हाद घोलप, देवदास खुडे (मा उपसरपंच ठाकुरकी), संजय जयसिंग इगंळे व सर्व सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्यावतीने मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
No comments