चोऱ्या थांबल्या नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मलठण, फलटण परिसरात तीन ते चार घरफोड्या भर दिवसा झालेल्या आहेत, त्याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आलेल्या असून, याबाबत काही तपास प्रगतीपथावर नाही, या भागात नेहमीच चोऱ्या होत असतात, पोलीस स्टेशनला संपर्क केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही असे नागरिकांच्या मधून चर्चा सुरू आहे,
मलठण साठी नवीन पोलीस मदत केंद्र मंजूर असून, त्याचे बांधकामही ६ महिन्यांपूर्वी झालेले आहे. तरीही पोलीस स्टेशन मार्फत या ठिकाणी कोणीही कर्मचारी नेमलेले नाहीत, त्यामुळे मलठण पोलीस चौकी बंद अवस्थेत आहे व चोऱ्यांचे प्रमाण रोज वाढत चालले आहे, पोलीस प्रशासनाने याची दखल न घेतल्यास फलटण शहर पोलीस स्टेशनवर सर्व मलटणकरांचा मोर्चा काढण्यात येईल याची दखल फलटण शहर पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घ्यावी व लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त करावा असा इशारा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.
No comments