Breaking News

ढवळेवाडी येथे कुऱ्हाडीने घाव ; एक गंभीर जखमी

Beaten with an ax at Dhawalewadi ; One seriously injured

    फलटण दि.१३ सप्टेंबर ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - माझ्या गोठ्याच्या शेजारी तु, तुझी म्हैस का बांधली? असे विचारल्याच्या कारणावरुन ढवळेवाडी येथील एकास शिवीगाळ दमदाटी करून,  कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून, गंभीर जखमी केल्या प्रकरणी ढवळेवाडी ता. फलटण येथील विलास माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, सुनिल तानाजी माने रा.ढवळेवाडी ता.फलटण यांच्या गुरांच्या गोठ्याच्या शेजारी  वैभव विलास माने रा. ढवळेवाडी ता.फलटण याने, त्याच्या मालकीची म्हैस बांधली होती. तेव्हा फिर्यादी सुनील यांनी त्यास विचारले की, माझ्या गोठ्याच्या शेजारी तु तुझी म्हैस का बांधली ? असे विचारल्याच्या कारणावरुन, चिडून जाऊन, वैभव विलास माने याने फिर्यादी सुनील यास  शिवीगाळ दमदाटी करून,  हातातील कुऱ्हाडीने डोक्यावर घाव घालून,  गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद सुनिल तानाजी माने यांनी दिली आहे. 

    यामध्ये सुनील माने हे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस नाईक गलियल हे करीत आहेत.

No comments